जळगाव (प्रतिनिधी) राजसाहेब ठाकरे यांची १ मे रोजी होणारी सभा, राजकीय हालचाली, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणूक व कार्य अहवाल या विविध विषयांवर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक दि. २४/२५ एप्रिल रोजी पद्मालय विश्रामगृह, नेहरू चौक जळगाव येथे होणार आहे.
दिनांक २४ एप्रिल सकाळी ११ वाजता मुक्ताईनगर, बोदवड, चोपडा, रावेर, भुसावळ येथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक, तर दुपारी २ वाजता जामनेर, पाचोरा, भडगाव यांच्या सोबत चर्चा होणार आहे. दि. २५ एप्रिल ११ वाजता एरंडोल, पारोळा,चाळीसगाव तर दुपारी 2 वाजता जळगाव ग्रामीण, धरणगाव तर दुपारी ४ वाजता सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी व ५ वाजाता जळगाव शहर पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व बैठकीला येतांना कार्य अहवाल आणावा असे संपर्क अध्यक्ष विनय भोईटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.