नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी इस्राईलच्या एनएसओ कंपनीच्या पेगसेस स्पायवेअरचा (Pegasus Spyware) वापर करून हेरगिरी केल्याप्रकरणी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. “मोदी सरकारने विरोधी पक्ष, सैन्य, न्यायपालिका सर्वांना लक्ष्य केलंय. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केलाय,” असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं.
हेरगिरीसाठी वापरल्या जाणाऱ्या पेगासस या इस्रायली स्पायवेअरवर न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या खुलाशांमुळे मोदी सरकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. २०१७ मध्ये झालेल्या संरक्षण करारात मोदी सरकारने क्षेपणास्त्र प्रणालीसह ती खरेदी केल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. हा करार २ अब्ज डॉलरचा होता. सरकारवर निशाणा साधत काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, “मोदी सरकारने आमच्या लोकशाहीच्या प्राथमिक संस्था, राज्याचे नेते आणि जनतेची हेरगिरी करण्यासाठी पेगासस विकत घेतला.” फोन टॅप करून सत्ताधारी पक्ष, विरोधक, सेना, न्यायव्यवस्था या सर्वांनाच टार्गेट केले आहे. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केला आहे.
पेगाससद्वारे हेरगिरी करणे हा देशद्रोह – मल्लिकार्जुन खरगे
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, ‘मोदी सरकारने भारताच्या शत्रूंसारखे का वागले आणि भारतीय नागरिकांविरुद्ध पेगासस का वापरले?’ ते म्हणाले, ‘पेगाससद्वारे हेरगिरी करणे हा देशद्रोह आहे. कोणीही कायद्याच्या वर नाही आणि न्याय मिळेल याची खात्री आम्ही करू.
भारताने इस्रायलशी संरक्षण कराराचा भाग म्हणून पेगासस विकत घेतला
युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही म्हणाले, “भारताने इस्रायलशी संरक्षण कराराचा भाग म्हणून २०१७ मध्ये पेगासस विकत घेतला. चौकीदार हा जासूस असतो हे न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालाने सिद्ध केले आहे.