नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जगभरात २३ लाख लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. चीन, अमेरिका, ब्रिटन आणि रशियातही लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, मोदीजी भारताचा नंबर कधी येणार?, असे ट्वीट करून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लसीकरणावरून प्रश्न विचारला आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. चीन, अमेरिका, ब्रिटन आणि रशिया या देशांनी कोरोना लसीकरणाला सुरुवात केली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लस निर्मिती केंद्रांना भेट दिल्यानंतर भारतातही लसीकरणाची तयारी सुरु करण्यात आली आहे. मात्र अद्याप लसीकरणाला सुरुवात झाली नाही. अशावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लसीकरणावरून प्रश्न विचारला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट केली यात ते म्हणाले की, “जगभरात २३ लाख लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. चीन, अमेरिका, ब्रिटन आणि रशियातही लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मोदीजी, भारताचा नंबर कधी येणार?”. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर ४ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. बैठकीनंतर ते म्हणाले की कोरोना लस काही आठवड्यांत तयार होईल, पहिला डोस आजारी वृद्ध आणि आरोग्य कामगारांना दिली जाईल. यापूर्वी २ नोव्हेंबरला मोदींनी व्हॅक्सीन बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटसह इतर तीन कंपन्यांना भेट देऊन आढावा घेतला होता.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीच्या पुढे गेल्यानंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. काही तयारी न करताच लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे कोट्यावधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला होता.