चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंग झाल्याची टना घडली असून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला पोक्सो कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तालुक्यातील एका गावात आरोपी संतोष जगन्नाथ धीवर (वय ४९) याने एका १७ वर्षीय मुलीला बोलून तू माझ्या पत्राचे छत असलेल्या घरी ये नाहीतर तुझे पप्पी घेतलेले फोटो दुसऱ्या लोकांना दाखवून तुझी बदनामी करेल. तसेच तुला मी मारुन टाकेल, अशी धमकी देवून फिर्यादीस त्याच्या पत्री छत असलेल्या घरी बोलावुन घेतले. त्यानंतर पिडीत मुलीस लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. तसेच मोबाईलमध्ये फोटो काढले व कोणाला सांगीतले तर तुला मारुन टाकेन, अशी धमकी दिली. या प्रकरणी भादवी कलम ३५४, ३५४, ५०६पोक्सो कलम प्रमाणे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहेत.