अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; धरणगाव पोलिसांकडून आरोपीला अटक !
धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसांनी आरोपी विनोद सुदाम पाटील याला अटक केली असून पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबीयांसोबत वास्तव्यास आहे. अल्पवयीन मुलगी वरच्या घरात एकटी काम करत असताना आरोपी विनोद सुदाम पाटील याने तिला हाताने जवळ येण्याचा इशारा केला. अल्पवयीन मुलगी घाबरून घरात गेली. त्यानंतर देखील आरोपीने पुन्हा हाताने इशारा केला. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस स्थानकात पोस्को कायद्याअंतर्गत आरोपी विनोद पाटील याच्याविरुध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच धरणगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास PSI संतोष पवार हे करीत आहे.