धरणगाव (प्रतिनिधी) शाळेत जातांना वारंवार पाठलाग करुन अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आलीय. या प्रकरणी धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीत विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १७ मार्च २०२२ पासून यातील संशयित आरोपी प्रविण पाटील (वय २२) याने आधी इन्स्टाग्रामवर ओळख केली. त्यानंतर पिडीता शाळेत जातांना तिच्या मागे येवून पाठलाग करुन लग्न करण्यासाठी माझ्यासोबत पळून चल, असे बोलायचा. पिडीतेने नकार दिल्यावर प्रवीणने बदनामी करण्याची धमको दिली. तसेच दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पिडीतेच्या घराबाहेर येत बोलण्यासाठी जबरदस्ती केली. एवढेच नव्हे तर पिडीतेचा पकडुन तू जर माझ्याशी बोलली नाही, तर तुला व तुझ्या घरच्या लोकांना बघुन घेईल, अशी धमकी देत शिवीगाळ केली. या प्रकरणी भादवि कलम ३५४,३५४ २,५०४,५०६ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ११,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहेत.