वरणगाव (प्रतिनिधी) येथील एका ठिकाणी राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेला अश्लिल फोटो व मँसेज पाठवून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अशोक चौधरी (रा. चंदू अण्णा नगर , जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. २९ एप्रिल २०२२ रोजी ते दिनांक ४ मे २०२२ रोजी पावेतो वेळोवेळी ३२ वर्षीय महिलेच्या व्हॉट्सअपवर आरोपी अशोक चौधरी याने त्याच्या मोबाईलवरून वेळोवेळी रात्री अपरात्री अश्लिल फोटो व अश्लिल मँसेज पाठवून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अशोक चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सफौ नरसिंग चव्हाण हे करीत आहेत.