जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलिसात गणेश प्रल्हाद शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. १९ जून २०२२ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गणेश प्रल्हाद शिंदे याने २६ वर्षीय तरुणी ही घरात एकटी असताना संशयित आरोपी तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलिसात गणेश प्रल्हाद शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोहेकॉ साहील इतबार हे करीत आहेत.