मुक्ताईनगर (प्रतिनिधी) पोलीसात पिडीतेच्या मुलाने तक्रार केल्याचा राग आल्याने 60 वर्षीय वयोवृद्धेस अश्लील शिविगाळ करून तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना शहरात मंगळवारी दुपारी साडेचार वाजता घडली. याप्रकरणी संशयित मोनु अर्जुन भोई (मुक्ताईनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
60 वर्षीय पिडीता एका भागात वास्तव्यास असून त्यांचा मुलगा संशयिताविरोधात मुक्ताईनगर पोलिसात तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर संशयिताने दारूच्या नशेत पिडीतेला अश्लील शिविगाळ केली. तसेच मुलाविषयी अपशब्द वापरून त्याचा खून करेल, अशी धमकीही दिली. या प्रकरणी भादंवि 354 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भोई करीत आहेत.