भुसावळ (प्रतिनिधी) येथील मध्य रेल्वे अखिल भारतीय एससी आणि एसटी रेल्वे कर्मचारी संघटनेतर्फे रेल्वे महामंडळाचे खाजगीकरण आणि आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात आज विरोध प्रदर्शन करत मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले. यात संघटनेचे १८ शाखा सहभागी झाले होते. मंडळ अध्यक्ष सुधीर जंजाळे, मंडळ सेक्रेटरी आर.सी. रावत यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
डी आर एम. कार्यालय येथील ऑल इष्ठिया एससीएस रेल्वे एम्पलॉईज असोसिएशन, भुसावळ मंडळतर्फे भारत सरकार तसेच रेल्वे मंत्रालयामार्फत अनुसूचित जाती व जनजातीविरुद्ध घेत असलेल्या नितीचा व निर्णयाचा निषेध म्हणून मोर्चा काढून विरोध प्रदर्शन करण्यात आला. प्रदर्शनात विविध मुद्दे माडून प्रधानमंत्री निवेदन स्वरूप डीआरएम यांना देण्यात आले. रेल्वेचे खाजगीकरण, जिगमीकरण तसेच भाडे तत्वावर स्कॅन, कारखाने देय करावी, अन्यथा बेराजगारीचा भस्मासूर होईल, मध्य रेल्वेमध्ये कोर्टाचा चुकीचा ससरा घेऊन पदोन्नतीमध्ये बंद केलेले आरक्षण पुन्हा सुरु करा, कारण हे संविधानविरूष्ट आहे. लोकसभा व राज्यसभेमध्ये नविन पदोन्नतीमध्ये आरहण नील पास करून संविधान सुचिक ९ मध्ये समाविष्ट करा, रेल्वे बोर्डला आदेशानुसार अनुसूचित जाती व जनजातीच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच पदोन्नतीस्तर पोस्टिंग मुळगावाजवळ करण्यात यावी, अनुकंम्पाच्या आधारावर एससी / एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना त्यांना योग्यतानुसार नोकरी देणे आदी मागण्याचा समावेश आहे.
या मोर्चात व विरोध प्रदर्शनमध्ये सभासद पदाधिकारी मोठ्या संख्येन सहभागी झाले होते. आदोलनात मंडळ अध्यक्ष सुधीर जंजाळे, मंडळ सचिव आर सी रावत, बी. डी बिऱ्हाडे (मंडळ कोषाध्यक्ष), विजय भालेराव, विशाल सपकाळे, वाल्मीक देहाडे, अजय अंगरे, विकास तारे, लाला लागले, संतोष साळवे, संतोष तायडे, एस एस भटकर, पप्पू तामडे, रानु मलना, राजेश यवाय, धडिराज जिम सोनवणे, रमेश जामने, दिपक मोरे, प्रदीप गायकवाड, विकास गौड़, कृष्णा भन्ते आदीचा सहभाग होता.
















