गोंदिया (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या सख्ख्या लहान मतिमंद भावाचा गळा आवळून हत्या केली आहे. आईनं दुचाकी घ्यायला पैसे न दिल्याच्या कारणातून त्यानं आपल्या भावाला संपवलं आहे. या प्रकरणी आमगाव पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, मला गाडी घेण्यासाठी पैसे पाहिजेत यासाठी हेमंत डोये (वय 23 वर्ष) याने त्याच्या आईजवळ हट्ट धरला होता, परंतु हेमंतची आई छगनबाई यांनी हेमंतचा लहान भाऊ भुवन डोये हा मतिमंद असल्याने त्याच्यावरती वैद्यकीय खर्च जास्त होत असल्याचे सांगून आता पैसे नाहीत असं सांगंत आईने नवीन गाडी घेण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला. मात्र भावाला वैद्यकीय उपचारासाठी पैसे लागतात म्हणून आई मला पैसे देत नाही. आणि त्या भावामुळे मला नवीन गाडी घेता येत नाही हा राग हेमंतने मनात ठेवला आणि त्याने या रागाच्या भरात हेमंत याने आपल्या आईसोबत कडाक्यांचे भांडण केले “मी तुला आज मारून टाकीन” अशी धमकी आपल्या आईला दिली होती या मुलाच्या धमकीला घाबरुन आई बाजूच्या घरी झोपायला गेली मात्र नराधन हेमंतने १९ वर्षीय मतिमंद असणाऱ्या भुवन डोये या भावाची रात्रीच्या सुमारास गळा दाबून हत्या केली. दरम्यान ही धक्कादायक घटना सकाळी उघड झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली. आमगांव पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
















