धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील बस स्थानकाजवळील शहा पेट्रोल पंपातून मोटारसायकलची चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील रोटवद येथील रहिवाशी राजेश पुंडलिक लोहार (वय,४३) आहेत. त्यांची मोटार सायकल हिरो होंडा मोटार सायकल क्र. (जी.जे.०५, केबी ७१३८) ही दि. २१ जुलै रोजी दुपारी लावलेली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची मोटार सायकल चोरून नेली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. उमेश पाटील हे करीत आहेत. दरम्यान, मागील काही दिवसापासून धरणगावातून मोटार सायकल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले. काही दिवसापुर्वी पोलिसांनी एका मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद केले होते. तरी देखील मोटार सायकल चोरी सुरु असल्यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.