जळगाव (प्रतिनिधी) एरंडोल पोलीस स्टेशन, पारोळा पोलीस स्टेशन व यावल पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील मोटार सायकल चोरट्यांना आज स्थनिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडील मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी जळगाव जिल्हयात चोरी होणारे मोटार सायकलचे गुन्हे उघडकीस आणणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना सुचना केल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोहेकॉ. विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अश्रफ शेख, नरेंद्र वारुळे, नितीन बाविस्कर, राहुल पाटील, प्रितम पाटील, चालक पोहेकॉ. राजेंद्र पवार, भारत पाटील यांचे पथक स्थापन केले होते.
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनिय माहिती मिळाली की, ब्राम्हणे ता. एरंडोल येथील प्रविण संभाजी पाटील हा जळगाव जिल्हयात मोटार सायकल चोरी सारखे गुन्हे करीत आहेत. त्याअनुषंगाने वरील पथकाने पाळधी गावाजवळ हायवे वर सापळा लावुन प्रविण संभाजी पाटील (वय ३० रा. ब्राम्हणे ता.एरंडोल जि.जळगाव) यास ताब्यात घेतले असता त्याचे सोबत TVS मोटार सायकल वर सागर सुभाष धनगर (वय २२ रा. निमगाव ता.यावल) हा मिळुन आला. त्या दोघांची अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडील असलेली मोटार सायकल ही एक वर्षापुर्वी एरंडोल येथुन चोरलेली आहे. त्याअनुषंगाने चौकशीत सदर बाबत एरंडोल पोलीस स्टेशन गुन्हा दाखल होता. तसेच त्यांनी पारोळा पोलीस स्टेशन व यावल पोलीस स्टेशन या गुन्हयातील मोटार सायकल चोरी केल्याचे कबुली दिल्याने सदर मोटार सायकली मिळुन आल्या आहेत. तसेच अधिक तपास कामी प्रविण संभाजी पाटील व सागर सुभाष धनगर यांना एरंडोल पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.