अमरावती (वृत्तसंस्था) अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांचे जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा नीर्वाळा देत उच्च न्यायालयाने आज नवनीत राणा कौेर यांचे जात प्रमाणपत्र रद्द करून न्यायालयाने २ लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. तर आगामी सहा महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले. सदर न्यायालयाच्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रामधील राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. यानंतर आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने हा घटनेवरील घोटाळा आहे, असे मत नोंदवून सदर जात प्रमाणपत्र रद्द करुन नवनीत राणा यांना २ लाखाचा दंड ठोठावला आहे. तसेच हे खोटे जात प्रमाणपत्र ६ आठवड्याच्या आत शासनाला जमा करण्याचे आदेशही दिले आहेत. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.