मुंबई (वृत्तसंस्था) भाजपच्या अधिकृत वेबासाईटवर एक मोठी चूक झाली आहे. रावेर मतदारसंघातील भाजप खासदार रक्षा खडसे यांचा या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष घातलं असून कारवाईचा इशारा दिला आहे. रावेर मतदार संघाच्या बिजेपी खासदार रक्षा खडसे यांच्याबद्दल पक्षाच्या वेबसाईटवर “होमोसेक्सुअल” असे लिहीलेला एक स्क्रीनशॉट सर्वत्र व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे.
‘भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे जी यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपने दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल,’ असं ट्वीट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर देशभरातील खासदारांची माहिती आहे. यामध्ये नाव, फोटो आणि मतदारसंघाचा उल्लेख आहे. मात्र रक्षा खडसे यांच्या मतदारसंघाचा उल्लेख करताना या वेबसाईटवर ‘होमोसेक्शुअल’ असं लिहिल्याचा स्क्रीनशॉट सगळीकडे व्हायरल होत आहे. सध्या तरी रक्षा खडसे यांच्या मतदारसंघाचं नाव भाजपच्या वेबसाईटवर दुरुस्त करण्यात आल्याचं दिसत आहे. मात्र Raver या नावाचं हिंदी गुगल ट्रान्सलेशन केल्याने ती चूक झाल्याचं सांगण्यात येत आहे.
बिजेपीच्या मान्यताप्राप्त वेबसाईटवर देशातील खासदारांची माहीती देण्यात आली आहे. या माहितीमध्ये खासदारांचे नाव आणि फोटोसह मतदारसंघाचे वर्णन देण्यात आले आहे. या वेबसाईटवर रक्षा खडसे यांच्या बाबतीत होमोसेक्सुअल असे लिहिल्याचा स्क्रीनशॉट सर्वत्र प्रसारीत झाल्याचे दिसून आले आहे. आता त्यात दुरुस्ती करण्यात आली असल्याचे सांगितले जात असून चुक दुरुस्त केली असल्याचे दिसून येत आहे. रावेर या नावाचे गुगल मधे हिंदी भाषांतर करतांना ती चुक झाली असल्याचे म्हटले जात आहे.