जळगाव (प्रतिनिधी) महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वैद्यकीय विमा योजनेबाबत मेडी असिस्ट संस्थेचे प्रादेशिक व्यवस्थापक अमित गायकवाड यांच्यासोबत जळगाव परिमंडळातील संघटना प्रतिनिधींसमवेत तक्रारी, सूचना व सुविधा याबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी मेडी असिस्टतर्फे कर्मचाऱ्यांचे शंकानिरसन करण्यात आले.
लघु प्रशिक्षण केंद्रात आयोजित बैठकीस उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संघटना प्रतिनिधींनी विविध सूचना केल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मधुसूदन सामुद्रे, मोहन गारुंगे यांनी सहकार्य केले. विरेंद्र पाटील, संध्या पाटील आदींनी संघटनांतर्फे सहभाग नोंदवला.