TheClearNews.Com
Thursday, July 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन क्षेत्रात महावितरणची आघाडी

The Clear News Desk by The Clear News Desk
June 20, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पर्यावरण पुरक आणि पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीला पर्याय म्हणून इलेक्ट्रीक वाहनांना मोठ्या प्रमाणात स्विकारल्या जात आहे. चालू दशकाच्या अखेरपर्यंत देशात विकल्या जाणा-या एकूण वाहनापैकी ३० टक्के ही इलेक्ट्रीक वाहने असणार आहेत. या वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहन धारकांना त्यांच्या वाहनांच्या चार्जिंगची व्यवस्था सहजतेने उपलब्ध व्हावी, यासाठी पुढाकार घेत महावितणने राज्यात १३ ठिकाणी इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन सुरु केली असून राज्यातील विविध ठिकाणी २,३७५ स्टेशन्स प्रस्तावित केले आहेत.

आत्तापर्यंत महावितरणने आपल्या उपकेंद्रातील अतिरिक्त जागांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वखर्चाने चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन करुन ठाण्यात ५, नवी मुंबई – २ पुणे – ५ आणि नागपूर -१ अशी एकूण १३ चार्जिंग स्टेशन सुरु केली आहेत. याशिवाय महावितरणमार्फत प्रस्तावित अतिरिक्त ४९ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सची कामे प्रगतीपथावर आहेत. यात नवी मुंबई -१०, ठाणे-६, नाशिक -२, औरंगाबाद-२, पुणे- १७, सोलापूर- २, नागपूर -६, कोल्हापूर – २, अमरावती – २ अशा चार्जिंग स्टेशनचा समावेश आहे. यासोबतच राज्य शासनाने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण- २०२१ दि. २३ जुलै २०२१ रोजी जाहीर केले आहे. त्यानुसार सन २०२५ पर्यंत राज्यातील इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग पायाभूत सुविधा बृहन्मुंबई शहर- १५००, पुणे शहर – ५००, नागपुर शहर- १५०, नाशिक शहर – १००, औरंगाबाद शहर -७५, अमरावती -३०, सोलापुर -२० अशी एकुण २,३७५ तसेच, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे संमृद्धी महामार्ग मुंबई-नागपूर, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग मुंबई-पुणे, मुंबई- नाशिक, नाशिक-पुणे हे पुर्णत: इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंग सुविधांनी सज्ज करण्यात येणार आहे.

READ ALSO

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

केंद्र सरकारने इलेक्ट्रिक चार्जिंग इकोसिस्टम सक्षम करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला कोणत्याही परवान्याशिवाय सार्वजनिक चार्जिंग स्टेशन सुरु करण्याची परवानगी दिली आहे. बसस्थानक, रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप किंवा शॉपिंग मॉलजवळ कुणीही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरु करु शकतो. याशिवाय आता महामार्गाच्या बाजूला इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनही उभारण्यात येत आहेत. शिवाय राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पायाभूत सुविधा पुरविण्याकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. शिवाय खाजगी व्यक्तींना चार्जिंग स्टेशन उभारायचे असल्यास त्यांना महावितरणतर्फे प्राधान्याने वीज पुरवठा करण्यात येत आहे. राज्य शासनाने जाहिर केलेल्या निर्णयात इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी वित्तीय प्रोत्साहन जाहिर करण्यात आले आहे. निमसार्वजनिक चार्जिंग स्टेशन्ससाठी मंदगतीचे १५,००० चार्जर व मध्यम वेगवान चार्जर ५०० अशी एकूण १५,५०० चार्जिंग पायाभुत सुविधासाठी अंदाजे रु. ४० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ही वित्तीय प्रोत्साहने वितरित करण्याकरिता महावितरणमार्फत अद्ययावत वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे.
‘पॉवरअप ईव्ही’ ॲप

इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, चार्जिंग स्टेशनची सद्यस्थिती तसेच भौगोलिक निर्देशांकाची माहिती प्रदान करण्यासाठी महावितरणने “PowerUpEV” नावाचे मोबाईल अप विकसीत केलेले आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनची सद्यस्थिती (उपलब्ध किंवा वापरात आहे), स्टेशन वर्णन, प्लग टाईप, शक्ती (डीसी, एसी). सुरु करण्याची वेळ, उपलब्ध वेळ (अॅपद्वारे बुकिंग). सद्यस्थळापासूनचे अंतर चालू स्थळावरुन जवळचे स्टेशन सर्व्हिसमध्ये नसल्यास किंवा उपलब्ध नसल्यास जवळचे पर्यायी चार्जिंग स्टेशन इत्यादी माहिती उपलब्ध आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

July 22, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

July 21, 2026
जळगाव

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
Next Post

विधानपरिषद निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेनेला मोठा धक्का ; ईडीकडून अनिल परबांना पुन्हा समन्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रंगकाम करताना इमारतीवरुन पडल्याने परप्रांतीय कामगाराचा मृत्यू !

February 1, 2024

जनसहभागाने महाराष्ट्रात चोपडा डेपोला प्रथम क्रमांक मिळवू : डेपो मॅनेजर महेंद्र पाटील !

August 15, 2023

शोपियान चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, बडगामध्ये एक SPO शहीद

February 19, 2021

माजी महापौर प्रदीप रायसोनी राजकारणात पुन्हा सक्रिय होणार ?

January 24, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group