TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणचे ‘मिशन आयपीडीएस’ यशस्वी तब्बल २५४ शहरांना दर्जेदार वीजपुरवठा सुरु

The Clear News Desk by The Clear News Desk
June 2, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील २५४ शहरांमध्ये वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी सुरु असलेल्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची कामे महावितरणने पूर्णत्वास नेली आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी विशेष लक्ष देऊन सातत्याने आढावा घेत या योजनेला गती दिल्याने राज्यातील तब्बल १ कोटी १५ लाख शहरी वीजग्राहकांचा वीजपुरवठा आणखी दर्जेदार झाला आहे.

शहरी भागातील वाढती ग्राहक संख्या व आधुनिक जीवनशैलीमुळे विजेचा वाढता वापर लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत (Integrated Power Development Scheme-IPDS) महावितरणने ४४ मंडल अंतर्गत २५४ शहरांमध्ये वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी विविध कामे सुरु केली. यामध्ये २०११ च्या जनगणनेनुसार १५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांची निवड करण्यात आली. या शहरांमध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांना अखंडित व योग्य दाबाचा वीजपुरवठा करणे, नवीन वीजजोडण्या देण्यासाठी वीजयंत्रणेचे विस्तारीकरण, सक्षमीकरण व आधुनिकीकरण करणे तसेच वीजहानी कमी करणे व त्याच्या योग्य मोजमापासाठी म्हणजे ऊर्जा अंकेक्षणासाठी (Energy Audit) ग्राहक व फिडरला योग्य क्षमतेचे मीटर लावणे आदी कामे करण्यात आली आहे.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

गेल्या सव्वा वर्षातील कोरोना काळातील खडतर आव्हानाला सामोरे जात महावितरणने एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतील २३०० कोटी रुपये खर्चाची कामे पूर्णत्वास आणली आहेत. यामध्ये प्रस्तावित १२० नवीन उपकेंद्रांपैकी ११९ उपकेंद्र कार्यान्वित झाले आहेत तर १०० पैकी १०० उपकेंद्रांची क्षमतावाढ करण्यात आली आहे. नवीन वितरण रोहित्रांचे ४ हजार ९८७ पैकी ४ हजार ९७० कामे पूर्ण झाली असून प्रस्तावित सर्वच ४ हजार २०७ रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात आली आहे. उच्च व लघुदाबाच्या ३ हजार ३४७ पैकी ३ हजार ४२ किलोमीटर वीजवाहिन्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे तर तब्बल ६ हजार ६९४ किलोमीटरच्या भूमिगत वीजवाहिन्या व एरीयल बंचची कामे पूर्ण झाली आहे. सोबतच शहरी भागामध्ये ५ लाख ३० हजार ३४० मीटर बदलण्यात आले आहे.

महत्वाची आयपीडीएस योजना पूर्णत्वास गेल्यामुळे राज्यातील २५४ शहरांमधील १ कोटी १५ लाख १५ हजार ६०० वीजग्राहकांना होणारा वीजपुरवठा आता अधिक दर्जेदार झाला आहे. ही कामे निर्धारित वेळेत व्हावी यासाठी राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या योजनेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठकी घेऊन या योजनेतील कामांचा आढावा घेतला. तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी विशेष लक्ष दिले आणि सातत्याने व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेऊन कामांना गती दिली. परिणामी महावितरणने आयपीडीएस योजनेतील सर्व कामे पूर्णत्वास नेत महत्वाची कामगिरी बजावली आहे.

देशात सर्वाधिक भूमिगत वीजवाहिन्या महाराष्ट्रात

एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून महावितरणने देशात सर्वाधिक ४ हजार ३६४ किलोमीटर लांबीच्या वीजवाहिन्या प्रस्तावित केल्या आणि त्याची कामे पूर्ण केली आहे. शहरी भागातील उपरी वाहिन्यांचे जाळे कमी करणे, यंत्रणेतील बिघाडांचे प्रमाण कमी व्हावे तसेच शहराच्या सौंदर्यीकरणाला चालना देण्यासाठी योजनेत भूमिगत वाहिन्यांना प्राधान्य देण्यात आले. त्याप्रमाणे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भूमिगत वीजवाहिन्यांचे काम पूर्ण झाले, हे या योजनेचे वैशिष्ट्य ठरले आहे. भूमिगत वीजवाहिन्यांसाठी राज्यातील अनेक शहरांमध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र त्यावर मात करीत महावितरणने ही कामगिरी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Next Post

फलोत्पादन क्षेत्र विकासमध्ये केळी फळासाठी जळगाव जिल्ह्याचा समावेश करावा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘दिवाळीनंतर नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा विचार करु’ ; अजित पवारांचं सुतोवाच

October 22, 2021

नागरिकांच्या जीवनाशी निगडित योजनांच्या पूर्णत्वास प्राधान्य : गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील

December 20, 2021

जिल्ह्यात आज ४२ कोरोनाबाधित, ४० झाले बरे !

January 8, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 जुलै 2025 !

July 14, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group