जळगाव(प्रतिनिधी) : मूल्याधिष्टीत पत्रकारिता शाबूत राहाण्यासह राज्यातील पत्रकारांच्या कल्याणासाठी स्थापन होऊन कार्यरत झालेल्या व्हाईस ऑफ मीडिया च्या उर्दूभाषिक सेल च्या जिल्हाध्यक्षपदी मो. हारून अ. कदीर खाटीक उर्फ मुफ्ती हारून नदवी, तर उपाध्यक्ष पदी पत्रकार मुश्ताक करिमी यांची निवड करण्यात आली आहे.
व्हाईस ऑफ मीडिया चे संस्थापक अध्यक्ष संपादक श्री संदीप काळे यांच्या सूचनेनुसार उर्दूभाषिक पत्रकारांची स्वतंत्र शाखा वा सेल असावी म्हणून ही निवड करण्यात आली.जळगाव जिल्ह्यातील उर्दू पत्रकाराची बैठक नुकतीच मुफ्ती हारून नदवी यांच्या अध्यक्षतेखाली येथे बैठक झाली असता, उर्दू सेल च्या अध्यक्षपदी मुफ्ती हारून नदवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या प्रसंगी उर्दू सेल ची कार्यकारिणी ही निवडण्यात आली ती अशी, उपाध्यक्ष – मुश्ताक़ करीमी, सरचिटणीस सईद पटेल,
कार्याध्यक्ष -रिज़वान रउफ खाटिक (भालोद यावल), सह सरचिटणीस-शेख़ शरीफ शेख सलीम (रावेर ), उपाध्यक्ष – शेख़ कामिल अब.रहमान (फैजपूर) कोषाध्यक्ष- अब्दुल रहीम पटेल( जलगाँव) प्रसिध्दी प्रमुख – इमरान खान अमजद खान (जामनेर प्रवक्ता – सलाहउद्दीन अदीब (भुसावल) कार्यकारिणी सदस्य सर्वश्री शरजील खान अक़ील (चाळीसगाव), शाकिर खान (जळगाव) असलम खान इब्राहीम खान (यावल), संघटक- शब्बीर अली नियाज़ अली सैयद (जळगाव)