जळगाव (प्रतिनिधी) येथील बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि१४) रोजी संपन्न झाली. या सभेत पुढील दोन वर्षांकरिता संस्थापक अध्यक्षा सुधाताई खटोड यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाची कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी वृंदा भालेराव, उपाध्यक्षा प्रियांका त्रिपाठी, मृदुला कुलकर्णी,सचिव अंजली हांडे, सहसचिव वर्षा पाठक ,कोषाध्यक्षा वृषाली जोशी, सविता नाईक यांची निवड झाली .प्रसंगी माजी अध्यक्ष मनीषा ताई दायमा प्रमुख सल्लागार स्वातीताई कुलकर्णी, राजश्री रावळ उपस्थित होत्या.
कार्यकारिणी सदस्यामध्ये वैशाली नाईक, छाया त्रिपाठी, अनुराधा कुलकर्णी, भगवती दायमा, उषा पाठक, अश्विनी जोशी, मानसी जोशी ,पुनम तिवारी, मालती वैष्णव, स्वप्नगंधा जोशी ,पुनम जोशी ,सोनल दायमा , किर्ती दायमा,गायत्री पंडित,मंजू शर्मा ,माधुरी कुलकर्णी ,हेमांगी डहाळे , कविता कोटस्थाने, स्मिता झारे,सविता परमार्थी यांची निवड करण्यात आली. लवकरच परशुराम जन्मोत्सवाच्या विविध समित्या स्थापन करण्याचेही ठरविण्यात आले. यावेळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला आणि सर्व भगिनींना तिळगुळ देण्यात आला.