पाचोरा (प्रतिनिधी) सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मुरलीधर जाधव यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार सोहळा दि. ३०-१२-२०२० बुधवार रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे. माणुसकी चा चौथा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा दुपारी १०:०० वाजता महारक्तदान शिबीर शासकीय रत्त पेढि साठि ०१:०० वा. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४१ व्यक्तीचां गुण गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यापैकी मुरलीधर श्रावण जाधव जन्म दि. १६/०४/१९८६ संपूर्ण पत्ता, मुंबई मु.पो. लोहारा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव कार्यरत असलेल्या कार्यालयाचे नाव.. महाराष्ट्र पोलीस व सर्पमित्र यापूर्वी मिळालेला विशेष पुरस्कार:- खानदेश मधील बहुमानाचा पुरस्कार खान्देश रत्न २०१९ सर्पमित्र म्हणून केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्रातील विविध संस्थांनी सन्मानपत्र देऊन गौरवले आहे. वयाच्या आठव्या वर्षी सर्पदंशानंतर मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडलेले जळगावचे सुपुत्र मुरलीधर जाधव यांनी गेल्या एका तपामध्ये पोलीस दलातील सेवेत तब्बल चार हजार सर्प पकडले. त्यांच्या या आतापर्यंतच्या प्रवासाला मुंबई पोलीस आयुक़्त संजय बर्वे यांच्याकडून गौरविण्यात आले. गेल्या वर्षी जर्मन देशानेही त्यांच्यावर डॉक्युमेंटरी बनवली होती. सध्या ते पोलीस शिपाई म्हणून कुर्ला पोलीस ठाणे येथे नियुक्तीस असून, मध्य नियंत्रण कक्ष येथे प्रतिनियुक्तीस आहेत. विशेष म्हणजे या कामाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची ‘मानद वन्यजीव रक्षक अधिकारी’ म्हणून नियुक्ती केली आहे. नुकताच जळगावमधील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘खांदेश रत्न २०१९’ चा पुरस्कारही त्यांना जाहीर झाला आहे.
सर्पाबाबत असलेली अंधश्रद्धा त्यांनी दूर केली, हजारो लोकांचे सर्पदंश झाल्यानंतर प्राण वाचवले. त्यांना जे मानधन मिळते त्या मानधनातून ते वन्यजीव आवर पैसा खर्च करतात सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत, जंगल क्षेत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात, वन्यजीवांसाठी स्वखर्चाने पाण्याचे हौद बांधून त्यात टँकरने पाणी टाकून वन्यजीवांची पिण्याच्या पाण्याची सोय करतात. म्हणून त्यांच्या कार्याला सलाम अश्या या आदर्श सर्पमित्र व महाराष्ट्र पोलीस मुरलीधर जाधव सरांना माणुसकी समुहाचा सेवा गौरव पुरस्कार निवड झाल्या बाबत पत्राद्वारे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यानी कळविले आहे.ह्या पुरस्काराबद्दल मुरलीधर जाधव समाजामध्ये सर्वेत्र कौतुक केले जात आहे.