परभणी (वृत्तसंस्था) शहराध्यक्ष सचिन पाटील यांची हत्या करण्यात आली आहे. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून शहरात खळबळ उडाली आहे. मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुनही सचिन पाटील यांच्या खुनाची माहिती देण्यात आली आहे.
प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार सचिन पाटील आपल्या सहकाऱ्यांसह कार्यालयात बसलेले असताना त्यांचा काही जणांशी किरकोळ वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि एका पदाधिकाऱ्यानं सचिन पाटील यांच्या मानेवर चाकूनं वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. सचिन पाटील यांना सहकऱ्यांनी तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. पण रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्यानं अखेर त्यांचा मृत्यू झाला. एका उमद्या नेतृत्व गमावल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हल्लेखोरांबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. त्यांच्या मृत्यूबद्दल मनसेकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.