चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील चहार्डी येथील शेतकऱ्याच्या एन.ए. केलेल्या प्लॉट मधुन अज्ञात चोरट्याने १८ इंची नागर चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात उदय दत्तयात्र पाटील (वय ५७ रा. चहार्डी ता. चोपडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २६ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ०७.०० ते दि २७ मार्च २०२२ रोजीचे सकाळी ०८.०० वाजेच्या सुमारास चहार्डी ता. चोपडा गावी येथील दत्त नारायण नगर येथील एन.ए. केलेल्या प्लॉट मधुन फिर्यादीचे मालकीची २० हजार रुपये किंमतीचा पारस कंपनीचे डबल पल्टिफाड १८ इंची नागर लबाडीच्या इराद्याने चोरुन नेली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना मधुकर पवार करीत आहेत.