बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतने आज विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ‘मोबाईल टॅबलेट’ उपलब्ध करून दिले. यावेळी विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतने शिक्षणाला आधुनिकतेची व कल्पकतेची जोड असल्याशिवाय शिक्षण हे अपूर्ण असते, ही बाब लक्षात घेऊन आज ग्रामपंचायतच्या वित्त आयोग निधीतून ” विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोबाईल टेबलेट”उपलब्ध करून दिले. त्यावेळी कार्यक्रमास सरपंच प्रवीण पाटील, उपसरपंच इंदुबाई दरबारसिंग पाटील व शेलवड केंद्राचे केंद्रप्रमुख प्रतिमा चौधरी ,नाडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाटील, ग्रामपंचायत सदस्य विकासभाऊ पालवे, दिलीप पौळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य व पालकवर्ग उपस्थित होते.