नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘मोदींचे तीन यार – नाटक, दंगल आणि अत्याचार’ असे ओवेसी यांनी म्हटले.
उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी “मोदींचे तीन यार – नाटक, दंगल आणि अत्याचार” असे ओवेसी यांनी म्हटले. विशेष म्हणजे त्यांनी ट्विटरवर हे म्हणत असल्याचा व्हिडिओही ट्विट केला आहे. यानंतर आपला मोर्चा अमित शाह यांच्याकडे वळवताना ओवेसी म्हणाले, आता अमित शाहांना उत्तर द्यायचे आहे. आम्ही कोणाचं कर्ज बाकी ठेवत नाही.
ओवेसी म्हणाले, “नसीमुद्दीनचं नाव घेतलं मात्र काँग्रेस पार्टी तर बोलणार नाही. नसीमचं नाव घेतलं तर आमची मतं मिळणार नाहीत. काँग्रेस इमरानचं नाव घेणार नाही. समाजवादी पार्टी आझमचं नाव नाही घेणार मात्र आम्ही अमित शाह आणि मुख्यमंत्री योगींना सांगू इच्छितो की, यूपीमध्ये योगी ‘राज’ (Raj) आहे. त्याचा अर्थ R (र) – रिश्वत(लाच), A – ‘अ’ अपराध(गुन्हा) किंवा आतंक(दहशत), आणि ‘J’ ‘अ’ चा अर्थ जातीवाद. अमित शाह तुमचं कर्ज फिटलं.”
ओवेसी यांनी या जाहीर सभेत हरिद्वारच्या धर्मसंसदेतील द्वेषपूर्ण वक्तव्यांचा मुद्दाही उपस्थित केला आणि ही धर्मसंसद भाजपा आणि पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने पार पडल्याचे सांगितले. देशात मुस्लिमांच्या हत्येची चर्चा होत असताना त्याविरोधात कोणी आवाज का उठवत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.