TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Bulli Bai : GitHub अ‍ॅपवर शेकडो मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करत विकृत कृत्य !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2022
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बुली बाई (Bulli Bai) नावाने गिटहब (GitHub) नावाच्या अ‍ॅपवर काही मुस्लीम महिलांचे आक्षेपार्ह फोटो अपलोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित अ‍ॅपवर देशातील काही प्रसिद्ध आणि नामांकित महिलांचे आक्षेपार्ह फोटो अपलोड करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर संबंधित फोटोंवर अश्लील मजकूर लिहिला जात आहे. शिवाय काहीजणांकडून या फोटोंचा सौदा केला जात आहे. यामध्ये एका महिला पत्रकाराचा देखील समावेश आहे. राहुल गांधी यांनी विरोधात ट्वीट करत सर्वांनी एकसुरात आवाज उठविण्याचे आवाहन केले आहे.

शनिवार, १ जानेवारी २०२२ रोजी बुली बाई नावाने अॅपवर फोटो अपलोड करण्यात आले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगितलं आहे. या अॅपवर मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले असून, त्याबरोबर आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला आहे. इतकंच नाही तर त्या फोटोंचा लिलाव केला जात आहे. यात एका महिला पत्रकाराचा फोटो अपलोड करण्यात आला असून आक्षेपार्ह मजकूरासह तो शेअर केला जात आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

मला आणि इतर तत्सम स्वतंत्र महिला आणि पत्रकारांना त्रास देण्यासाठी हे डिझाइन केलेलं

“आज सकाळी मला हे कळल्यावर धक्का बसला की bullibai.github.io नावाच्या वेबसाइट/पोर्टलवर (हटवल्यापासून) अयोग्य, अस्वीकार्य आणि स्पष्टपणे अश्लील संदर्भात माझे छेडछाड केलेले चित्र आहे. याबाबत त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे. मला आणि इतर तत्सम स्वतंत्र महिला आणि पत्रकारांना त्रास देण्यासाठी हे डिझाइन केलेलं आहे,” अशी तक्रार त्या महिला पत्रकाराने केली आहे.

प्रकरणाचा तीव्र पडसाद

या प्रकरणाचे तीव्र पडसाद आता उमटू लागले आहेत. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. होस्टिंग प्लॅटफॉर्म गिटहब वापरून शेकडो मुस्लिम महिलांचे फोटो अॅपवर अपलोड केले असल्याचं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे. मुंबई पोलिसांकडे याप्रकरणाची तक्रार करण्यात आली असून, दोषींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. यासंदर्भात प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट केलं आहे, त्यात त्यांनी लिहिलं आहे. ‘मी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) रश्मी करंदीकर यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आहे. तसंच महाराष्ट्राच्या पोलीस महासंचलाकांनाही मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. चुकीच्या सेक्सिस्ट साईटमागे जे आहेत ते लवकरच पकडले जातील.

मुंबई सायबर पोलिसांनी सुरु केला तपास

मुंबई पोलिसांनी या याप्रकरणीच गंभीर दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई सायबर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. या अॅपमध्ये नाव असलेल्या एका मुस्लीम महिला पत्रकाराने सांगितलं की मुस्लिम महिलांसाठी नवीन वर्षाची सुरुवात भीती आणि द्वेषाच्या भावनांनी झाली आहे. गेल्या वर्षी ‘सुल्ली डील्स’ चा वाद झाला होता. यातही मुस्लीम महिलांच्या फोटोचा गैरवापर करण्यात आला होता. पण दोषींविरोधात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती.

तेंव्हाच महिलांचा अपमान आणि धार्मिक द्वेष बंद होईल – राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज रविवारी मुस्लीम महिलांच्या ‘लिलाव’ करणाऱ्या एका ऍप्लिकेशन विरोधात ट्विट करत आवाज उठवण्याचं आवाहन केलं आहे. महिलांचा अपमान आणि धार्मिक द्वेष तेंव्हाच बंद होईल जेंव्हा आपण सगळे एकासुरात आवाज उठवत याविरोधात ठामपणे उभे राहू. वर्ष बदललं आहे, अवस्थाही बदलू. आता बोलायलाच हवं. असं त्यांनी ट्विट केलंय. पुढे #NoFear असं देखील त्यांनी म्हटलंय.

अॅप ब्लॉक केले गेले आहे – आयटी मंत्री अश्विनी वैष्णव

आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय की, हे अॅप ब्लॉक केले गेले आहे आणि पुढील कारवाई केली जात आहे. “GitHub ने आज सकाळीच वापरकर्त्याला ब्लॉक केल्याचं सांगितलं आहे. CERT आणि पोलीस अधिकारी पुढील कारवाईबाबत प्रयत्नशील आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #GitHub#Muslim_women

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून खून ; आरोपीला एका दिवसांची पोलीस कोठडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गणपती बाप्पाबरोबर माझा भाजप प्रवेशही विसर्जित झालाय : एकनाथराव खडसे !

September 22, 2024

पाचोरा – भडगाव रस्त्यावर अपघात, शेंदुर्णीचे दोघे ठार

June 13, 2021

जलजीवन योजनेमधील कामांना अधिक गती द्यावी : ना. गुलाबराव पाटील !

August 21, 2024

धरणगावात तुकोबांच्या बिजनिमित्त पालखी सोहळा उत्साहात साजरा !

March 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group