चोपडा (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून शिवसेना (शिंदे गट) प्रणीत शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार नरेंद्र वसंतराव पाटील गरताडकर यांची तर उपसभापती म्हणून विनायकराव चव्हाण यांची आज निवड करण्यात आली. याप्रसंगी शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे व विद्यमान आमदार लताताई सोनवणे हे उपस्थित होते.
चोपडा येथे चंद्रकांत सोनवणे माजी आमदार यांना विचारणा केली असता त्यांनी की, हे सर्व सामान्य शेतकऱ्यांचे सरकार असून शेतकऱ्यांचे ही विकासाचे निर्णय घेतले जातील. मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता कृषि उत्त्पन्न बाजार समितीत होती. ह्या निवडणूकीत एक गट वेगळा झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन गट निर्माण झाले होते. याच संधीचा फायदा घेत शिंदें गट (शिवसेना) ह्यांनी आपले उमेदवार उभे केले असता व सर्व साधारण शेतकरी कुटुंबातील उमेदवार दिल्यामुळे मतदारांनी विश्वास ठेवून मतदान केले. त्यात शिवसेना शिंदे गटाचे नऊ तर राष्ट्रवादीचे दोन्ही गट मिळून नऊ असे समान उमेदवार निवडून आले होते. परंतु सभापतीची माळा नेमकी कोणाच्या गळ्यात पडते याबद्दल जनतेत उत्सुकता होती. परंतू शिवसेना (शिंदे गट) सभापती होईल असे निश्चित होते. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या गटाला उपसभापती पद मिळेल अशी चर्चा होती आणि त्यानुसार उपसभापतीची माळ विनायक रामदास पाटील यांच्या गळ्यात पडली.
यावरून मतदारांनाही बदल हवा होता असे चित्र समोर आले आहे. यावेळी विश्रामगृहावर माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, आमदार लताताई सोनवणे हे उपस्थित होते. तर सभापती उपसभापती निवड ठिकाणी रोहित निकम, ऍड घनश्याम अण्णा पाटील, माजी आमदार कैलास बापू पाटील, कृषि उत्त्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नंदकिशोर पाटील, नितीन पाटील, सुकलाल कोळी, पंचायत समितीचे उपसभापती एम.व्ही. पाटील सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील भुरड, अनिल रामदास पाटील, घनश्याम अग्रवाल, सुनील अग्रवाल, गोपाल पाटील, कांतीलाल पाटील आदी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.