जामनेर (प्रतिनिधी) नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की, त्यांनी आमच्या सोबत राहिले पाहिजे. नाथाभाऊंना राजकारण नीट समजतं. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते जामनेर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.
माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जी. एम. फाउंडेशन संचलीत ग्लोबल महाराष्ट्र या सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जामनेरात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की, त्यांनी आमच्या सोबत राहिले पाहिजे. नाथाभाऊंना राजकारण नीट समजतं. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील. नाथाभाऊंसोबत आज कुठलीही चर्चा झाली नाही. परंतू योग्य वेळी मी चर्चा देखील करेल. आणि मला असं वाटतं तसेच मला पूर्ण विश्वास आहे की, नाथाभाऊ योग्य निर्णय घेतील, असेही फडणवीस म्हणाले.