TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन प्रतिबंधात्मक क्षेत्राची प्रभावी अंमलबजावणी करा : डॉ. अर्चना पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
April 27, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क व लो रिस्क व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांची चाचणी करा. तसेच बाधित रुग्णांच्या संख्येनुसार प्रतिबंधात्मक क्षेत्र ठरवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. अशा सुचना आरोग्य संचालक डॉ अर्चना पाटील यांनी आज दिल्यात. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने केलेल्या तयारीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात डॉ. अर्चना पाटील यांनी जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक यांचेशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला, यावेळी डॉ. पाटील बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) सतीश दिघे आदी उपस्थित होते.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

डॉ. पाटील पुढे म्हणाल्या की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित रुग्णाच्या संपर्कातील हाय रिस्क व्यक्तींचा ४८ तासाच्या आत शोध घेतला पाहिजे. तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्राची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मायक्रो झोन तयार केले पाहिजे. जेणेकरुन त्या भागाचे सर्वेक्षण व्यवस्थित होऊन संशयित रुग्ण शोधण्यास मदत होते. प्रतिबंधात्मक क्षेत्रात सर्वेक्षण करतांना सारी व सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण सापडले पाहिजेत. कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी देण्यात येणारे थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर योग्य पध्दतीने काम करीत आहेत का याचीही तपासणी करावी. कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या कामाचे समान वाटप करा. तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिक्षक यांनी समन्वय राखून आपल्या तालुक्यातील कामाचे नियोजन करावे. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नियमितपणे प्रतिबंधात्मक क्षेत्र, कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला भेटी द्याव्यात. त्याचबरोबर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये जम्बो सिलेंडरची तरतुद करावी.

ऑक्सिजन मॅनेजमेंट सिस्टिम लागू करा

सध्या राज्यात ऑक्सिजनचा साठा कमी असल्याने उपलब्ध ऑक्सिजनचा वापर योग्य पध्दतीने होण्यासाठी ऑक्सिजन मॅनेजमेंट सिस्टिम लागू करा. याकरीता प्रत्येक ठिकाणी दोन स्वतंत्र नर्सची नियुक्ती करावी. रुग्णाच्या आवश्यतेनुसारच त्याला ऑक्सिजन दिला गेला पाहिजे. तसेच दर चार तासांनी प्रत्येक रुगणांची ऑक्सिजन पातळी तपासावी. उपलब्ध ऑक्सिजन वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी त्याचबरोबर रुग्णांची रक्त तपासणी दैनंदिन करावी. लसीकरण करतांना शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याच्या सूचना देतांनाच कोरोना सोबतच डिलीव्हरीचे पेशंट, अपघात व दैनंदिन तपासणीच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये असेही त्यांनी सांगितले. दैनंदिन कामाची माहिती कोविन व ईविन पोर्टलवर अपडेट करण्याच्या सुचनाही डॉ पाटील यांनी सर्व यंत्रणांना दिल्यात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

हनुमान जयंतीनिमित्त भाजपा जिल्हा महानगरतर्फे ५३ रक्त दात्यांनी केले रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जून 2026 !

June 30, 2026

कोरोनाचा उद्रेक : दिल्लीत आज रात्रीपासून लॉकडाऊन, अरविंद केजरीवाल यांची घोषणा

April 19, 2021

अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

January 20, 2021

धावडा-धरणगाव नवीन पाईप लाईनसाठी 44 कोटी रुपयांचा निधी मंजूर !

February 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group