धरणगाव (प्रतिनिधी) आज धरणगाव तालुका येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सदस्य नोंदणी अभियानाची शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाला ओ.बी. सेलचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नाना महाजन, माजी नगराध्यक्ष पुष्पाताई महाजन, जिल्हा उपाध्यक्ष रमेश बापू पाटील, तालुकाध्यक्ष शामकांत पाटील, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, जिल्हा युवक कार्याध्यक्ष नाटेश्वर पवार, सामाजिक न्याय प्रदेश उपाध्यक्ष कल्पना ताई अहिरे, युवती जिल्हाध्यक्ष मृनाली पवार, अरविंद आबा देवरे, जिल्हा सरचिटणीस निंबा पाटील, कैलास चव्हाण, युवक शहराध्यक्ष यशवंत वराडे, प्रविण मराठे, रविंद्र महाजन, निलेश भदाणे, हेमंत पाटील, राजु पाटील आणि इतर तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.