भुसावळ (प्रतिनिधी) येथे संपुर्ण देशात १० प्रमुख केंद्रीय कर्मचारी महासंघाद्वारे व रेल्वे, संरक्षण, बिमा, इन्कम टैक्स, बैंक, टपाल, अन्य केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महासंघाद्वारे स्थापित एनजेसीए (नॅशनल जॉईंट कॉन्सील फॉर एक्शन) द्वारा देशव्यापी १ दिवसीय “कॉल अटेन्शन डे” दि. १ फेब्रुवारी २०२१ रोजी सरकार द्वारा बजेट सादर करण्यात येणार असल्याने साजरा करण्यात आला.
यात प्रमुख मागणी देशातील रेल्वे, संरक्षण आदिंचे सरकार द्वारा निगमिकरण करण्याचे प्रस्ताव रद्द करणे, सरकार द्वारा डिए फ्रिज वापस घेणे, जानेवारी २००४ पासुन लागू नवी पेन्शन रद्द करणे, ७ वे वेतन आयोगातील आणि लागु करणे, संरक्षण विभागात १००% अनुकंपा भर्ती करणे, रिक्त जागा भरणे, अन्य १३ सुत्री मागण्यांसाठी साजरा करण्यात आला. सोमवार रोजी सर्व कर्मचारी आयुध निर्माणी मुख्य गेटवर सकाळी जमुन सरकार विरूद्ध जोरदार घोषणाबाजी व निदर्शने केली. संरक्षणचे निगमिकरण प्रस्ताव रद्द करण्यासाठी सरकारचे लक्ष वेधले. संरक्षण मध्ये कार्यरत AIDEF, INDWF, BPMS चे संयुक्त राष्ट्रीय समितीचे आदेशानुसार स्थानिक संयुक्त समिती द्वारे हा कार्यक्रम संपन्न झाला. असुन सर्व कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली. दिपक भिडे, किशोर सुर्यवंशी, किशोर चौधरी यांनी संबोधित केले. किशोर पाटील, प्रविण मोरे, अनिल सोनवणे, कैलास राजपुत, एम एस राऊत, एन डि पाटिल, विजय साळुंखे, सूर्यभान गाढे, एम डि वानखेडे सह संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. दिनेश राजगिरे संयोजक स्थानिक संघर्ष समिति यांचे मार्गदर्शन लाभले.