अमळनेर (ईश्वर महाजन) नवरात्र उत्सवाची धुम यावर्षी विशेष रंगत आली आहे. कोरोनाच्या दोन वर्षीच्या ब्रेक नंतर यावर्षी साजरा होणारा नवरात्र उत्सव ही राजकीय धुळवड ठरणार आहे.
यावर्षी विदयाविहार काँलनीतील तरुण मंडळांनी नवरात्री उत्सवाचा कार्यक्रम हाती घेतल्याने काँलनीत उत्सवाचे वातावरण आहे. नवरात्री उत्सवात महीला व पुरूष व तरूणाईने गरब्याच्या खेळात धमाल केली आहे. मंडळाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सदस्य यांनी सांगितले की, ह्या वर्षी नवरात्रीला सगळ्या विद्याविहार कॉलनीतील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून उत्सव खुप थाटामाटात होत आहे. नवरात्र बसवण्याची ईच्छा लहान कार्यकर्तेची होती पण मोठ्यांनी त्यात सहभाग घेऊन शोभा वाढवली व कॉलनी तसेच बाहेर गावाला जे गेले आहेत त्यांनी पण वर्गणी देऊन सहकार्य केले. नगरसेवक रवी पाटील यांनी संपूर्ण पटांगण स्वच्छ करून दिले. तसेच पोलीस परवानगीसाठी कपिल पाटील व सूर्यकांत साळुंखे यांनी मदत केली. मंडळाचे अध्यक्ष योगेश शिरसाठ व उपअध्यक्ष संजय पाटकरी हे देखील संपूर्ण वेळ देऊन सहकार्य करत आहेत.
विशेष सहकार्य करणारे मोहीत पवार,बबनदादा, सागर विसपुते, धीरज पाटील, श्री भैय्यादादा(जळोदकर )विकास महाजन, अमोल पाटील, अमोल दुसाने, प्रविण पाटील (भटूभाऊ ), गजूदादा, छोटू साळुंखे, बापू कोळी, विजय येवले, विनोद पाटील(मातोश्री टेन्ट ), दिनेश पाटील, रोहित तेले, विवेक तेले, किरण अहिरे, यश अहिरे, भगीरथ पाटील, सचिन सोनवणे, उमेश अहिरे हे रोज सहकार्य करत आहेत. व लहान कार्यकर्ते सनी पाटील, यश पाटील, विवेक निकम, मयुर पाटील, सोनू महाजन, बाळा, मुन्ना,गोलू, हे सगळे फुलहार आणणे जे सांगितलं ते काम व्यवस्थित करीत आहेत व कार्यक्रमाला मार्गदर्शन योगेश चौधरी, प्रवीण महाजन, डॉ राहुल वानखेडे, सागर काळपांडे हे करीत आहेत.
वरील सगळ्यांचे मनापासून प्रयत्न व साथ असल्यामुळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडत आहेत. मोलाचे मार्गदर्शन हे पत्रकार ईश्वर महाजन व प्रमोद पवार, मनोहर मोरे, प्रशांत कुडे, अश्विन पाटील, सुनील शिंगाने, स्वप्नील पाटील जयंत पाटील यांचे मिळत आहे. उत्कृष्ट गरबा खेळणाऱ्या तरूणांना व जेष्ठ बंधू व भगिनींनीं मंडळाचे पदाधिकारी बक्षिसे देऊन सन्मानित करतात.