मुंबई (वृत्तसंस्था) अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी पुन्हा एकदा एनसीबीवर (ncp) आरोपांचा बॉम्ब टाकला आहे. फर्जीवाडा करून लोकांवर खोटे आरोप लावले, लोकांना अडकवण्यात आलं असं म्हणत नवाब मलिक यांनी आज एक ऑडिओ क्लीप (audio clip) समोर ठेवली आहे. तसेच भाजपावर (bjp) एक गंभीर आरोप केला आहे.
हे भाजप नेते कोण आहेत, याचाही मी शोध घेणार
३१ डिसेंबर २०२१ रोजी समीर वानखेडे यांचा एनसीबीच्या विभागीय संचालक पदाचा कार्यकाळ संपला. यावेळी त्यांनी मुदतवाढ मागितली नसल्याचेही सांगण्यात आले. परंतू लाखो रुपये खर्चून पीआर एजन्सीच्या माध्यमातून अशा बातम्या माध्यमांमधून पेरल्या जात आहेत. एनसीबीने समीर वानखेडे (खान) यांना मुदतवाढ दिली नसली तरी राज्यातील काही भाजप नेते वानखेडे इथेच राहावेत यासाठी दिल्लीत लॉबिंग करत आहेत, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे. तसेच, हे भाजप नेते कोण आहेत, याचाही मी शोध घेणार आहे. लवकरच त्यांनाही मी एक्सपोज करणार असल्याचं नवाब मलिकांनी इशाराच दिला आहे. समीर वानखेडे इथेच राहावेत आणि आपल्याला आणखी फर्जीवाडे करता यावेत यासाठी दिल्लीत प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
एनसीबीने अनेक फर्जीवाडे करुन खोट्या केसेस दाखल केल्या
एनसीबीने अनेक फर्जीवाडे करुन खोट्या केसेस दाखल केल्या. लोकांना त्यात फसवले गेले. मोठी वसुली करण्यात आली. मी फर्जीवाडे बाहेर काढल्यानंतर मलाही धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझ्यावर मानहानीची केस दाखल करण्यात आली. पण न्यायालयाने जर कोणती राष्ट्रीय यंत्रणा काही चूकीचे करत असेल तर त्यावर बोलण्याचा मला अधिकार दिला असल्याचंही त्यांनी म्हटंल आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये एक किरण बाबू नावाचा अधिकारी
दरम्यान याचवेळी नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी आणि एका पंचाचे संभाषणाचे दोन ऑडियो क्लिपही शेअऱ केले आहेत. पत्रकार परिषदेत नवाब मलिकांनी सादर केलेल्या दोन वेगवेळ्या ऑडिओ क्लिपमध्ये एक किरण बाबू नावाचा अधिकारी आणि दुसऱ्यांदा समीर वानखेडे एका मॅडी नावाच्या व्यक्तीला पंच बनण्यासाठी बोलत असल्याचं दिसतंय. कार्यालयात येणं अडचणी ठरेल म्हणून बाहेर भेटण्यास सांगत आहेत. समीर वानखेडेंना जेव्हा तो मॅडी नावाचा पंच विचारतो की, ‘या प्रकरणात आधीच एवढ्या अडचणी सुरू आहे. काही होणार तर नाही ना?’ तेव्हा समीर वानखेडे म्हणतात की बिनधास्त जाऊन भेट असं या ऑडिओ क्लिपमधून समोर येत असल्याचं नवाब मलिक म्हणाले. एनसीबीने या प्रकरणात योग्य कारवाई न केल्याचा आरोप करत त्यांनी NCB फर्जीवाड्याची मर्यादा ओलांडत असल्याचं नवाब मलिक म्हणाले. के.पी. गोसावी, भानूशाली, बोगस कागदांवर सही घेणे हे सर्व फर्जीवाडे समोर आणल्यावर एनसीबीने चौकशी समिती स्थापन केली मात्र त्यांनी काहीही कारवाई केली नसल्याचं दिसतंय.
एनसीबीने या प्रकरणात योग्य कारवाई न केल्याचा आरोप करत त्यांनी NCB फर्जीवाड्याची मर्यादा ओलांडत असल्याचा आरोप केला. नवाब मलिक म्हणाले. के. पी. गोसावी, भानूशाली, बोगस कागदांवर सही घेणे, खोटे पंच तयार करणे हे सर्व फर्जीवाडे समोर आणल्यावर एनसीबीने चौकशी समिती स्थापन केली मात्र त्यांनी काहीही कारवाई केली नसल्याचं दिसतंय.