जळगाव (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक भाजप नेत्यावर विविध गंभीर स्वरूपाचे आरोप करीत आहेत. याला उत्तर देताना गिरीश महाजन हे म्हणाले की, नबाब मलिक करीत असलेले बेछूट व बिनबुडाचे आरोप पाहता त्यांची सध्या मनस्थिती ठीक नाही असे वाटतंय.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज जळगावात मोर्चा काढण्यात आला. यावेळी स्वतः ट्रॅक्टर चालवीत गिरीश महाजन यांनी मोर्चामध्ये सहभाग नोंदविला. या मोर्चादरम्यान महाजन यांनी मिडीयाशी संवाद साधताना मलिक यांच्यावर निशाणा साधला. राज्यात एवढे प्रश्न असतांना त्याकडे लक्ष न देता मलिक हे बेछूट आरोप करीत आहेत. त्यांना सध्या लवंगी फटाके फोडू द्या, येत्या काळात त्यांना कळेल देवेंद्र फडणवीस कोणता बॉम्ब फोडणार आहेत. ते तेव्हा कळेल ते कुठे आहेत आणि काय बरळत आहेत.