जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर च्यावतीने जळगाव शहरातील अस्वच्छता, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, आरोग्य, घनकचरा प्रकल्प, खड्डेयुक्त रस्ते, अमृत योजना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचार अशा विविध विषयांवर महानगरपालिकेच्या आवारात धरणे आंदोलन करून घोषणा बाजी केली. तद्नंतर सदरचे निवेदन महानगरपालिका आयुक्त व महापौर यांना देण्यात आले.
महानगरपालिका आयुक्त यांच्या वतीने उपायुक्त शयाम गोसावी यांनी निवेदन स्वीकारले व आंदोलकांशी चर्चा केली. सत्ताधाऱ्यांच्या वतीने माजी महापौर विष्णू भंगाळे व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनीही आंदोलकांशी चर्चा केली. सदर निवेदनाची दखल घेऊन लवकरच योग्य उपाययोजना करण्यात येतील असे उपायुक्त गोसावी यांनी आंदोलकांना आश्वासन दिले. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अँड. भैय्यासाहेब रवींद्र पाटील, महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी, महिला महानगर अध्यक्ष मंगला पाटील, वाल्मिक पाटील, अशोक पाटील, राजू मोरे, सुनील माळी, डॉ. रिजवान खाटिक, अमोल कोल्हे, कल्पिता पाटिल, दिलीप माहेश्वरी, रमेश बाऱ्हे, अँड. राजेश गोयर, सुशील शिंदे, विशाल देशमुख, किरण राजपूत, रहीम तडवि, भगवान सोनवणे, राहुल टोके, किरण चव्हाण, अनिल पवार, जुबेर खाटिक, जितू बागरे, हर्षवर्धन खैरनार, पंकज वाघ, किरण चव्हाण, सिदार्थ गव्हाणे, महेंद्र टेकावडे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
















