अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पोलिस दप्तरी कुख्यात म्हणून ख्याती असलेल्या राजेश उर्फ दादू एकनाथ निकुंभ (20, पारधीवाडा सुभाष चौक, अमळनेर) याच्यावर एमपीडीपी (स्थानबद्ध) (Mpda Amalner ) ची कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारी क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दादू निकुंभविरोधात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, विनयभंग, घरफोडी, आर्म अॅक्ट, दुखापत आदी प्रकारचे तब्बल 11 गुन्हे अमळनेर पोलिसात दाखल असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी दिली. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी संशयीतावर कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक, जळगाव व जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मंजूर करवून त्यास MPDA कायद्याअंतर्गत नाशिक सेन्ट्रल कारागृहात स्थानबद्धतेसाठी पाठविण्यात आले आहे. गुन्हेगारावर कठोर कारवाई झाल्याने अमळनेरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे व पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या टिमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना या कामात त्यांच्या मुख्य टिममधील किशोर पाटील, दीपक माळी, रविंद्र पाटील, शरद पाटील, सिद्धांत सिसोदे यांनी तसेच पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, प्रमोद पाटील, जितेंद्र निकुंबे, कमलेश बाविस्कर यांनीदेखील सहकार्य केले. दरम्यान, राजेश उर्फ दादू एकनाथ निकुंभ विविध प्रकारचे तब्बल ११ गुन्हे तसेच तीन प्रतिबंधानात्मक आलेल्या आहेत.
राजेश उर्फ दादू निकुंभ विरुध्द अमळनेर पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, विनयभंग, घरफोडी, आर्म अॅक्ट, दुखापत अश्या प्रकारचे गुन्हे दाखल असून त्यास त्या गुन्हयांमध्ये वेळोवेळी अटक करण्यात आल्यानंतर तो न्यायालयातून जामीनावर सुटताच पुन्हा भारतीय दंड विधान, व मुंबई पोलीस कायदा अंतर्गत सराईतपणे गुन्हे करीत होता. त्याची गुन्हेगारी पार्वभूमी पाहता तो व आपल्या सोबत असणाऱ्या गुंडा सोबत घातक शस्त्रे सोबत ठेवून लोकांवर दहशत व भिती निर्माण करीत होता. त्यास कायदयाचा अजिबात धाक राहिलेला नव्हता त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठया प्रमाणात बाधा निर्माण होवून लोकांच्या मनात असुरक्षीतेची भावना तयार झाली होती. दिवसेदिवस वेगवेगळ्या तऱ्हेने गुन्हे करण्याची त्यांचे प्रवृत्ती बळावत असल्याने सर्व सामान्य लोकांच्या जिवीतास तो उपद्रवी बनला होता. त्यामुळे त्याचे विरुध्द महाराष्ट्र झोपडपटटी दादा, हात भटटीवाले औषधी विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हीडीओ पायरेट) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबत अधिनियम सन १९८१ नुसार ‘धोकादायक व्यक्ती’ या संज्ञेत तो मोडत असल्याने त्याचे विरुध्द सदर कारवाई करणे आवश्यक होते. त्यानुसार अमळनेर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक, श्री. विजय शिंदे यांनी त्याचे विरुध्द चौकशी पूर्ण करुन दि. २० / १२ / २०२२ रोजी पोलीस अधिक्षक जळगांव मा. श्री. एम राज कुमार सो. याचे कडेस प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची पडताळणी करुन पोलीस अधिक्षक सो. यांनी मा. जिल्हादंडाधिकारी जळगांव यांचे कडेस पाठविलेला होता.
त्यानुसार आज रोजी आज रोजी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आदेश जारी केला. त्यानुसार पोलीस अधीक्षक एम राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगाव अपर पो. अधिक्षक चंद्रकांत गवळी, व अमळनेर भागचे उपविभागीय पो. अधिकारी राकेश जाधव यांच्या मागदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील व अमळनेर पो.स्टे. चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी स्था.गु.शा. कडील व एमआयडीसी पो.स्टे कडील संयुक्त पथक तयार करुन त्यात पोलीस उप निरीक्षक अनिल भुसारे, पोना/दिपक माळी, पोना/ रविंद्र पाटील, पोना/किशोर पाटील, पोना/सिध्दार्थ शिसोदे सर्व नेम. अमळनेर पो.स्टे. व सफौ/युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ/सुनिल दामोदरे अश्यांनी दि. ५ जानेवारी रोजी ताब्यात घेवून त्याची जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे मध्यवर्ती कारागृह नाशिक याकारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे.