मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना भवन तोडण्याच्या विधानावर संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. यावरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत हल्लाबोल केला आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत संजय राऊतांना शिवसेना भवनात नेऊन फटके देऊ असा इशारा दिला आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करत संजय राऊतांना शिवसेना भवनात नेऊन फटके देऊ असा इशारा दिला आहे. “हे काय ऐकतोय मी की संज्या धमकी द्यायला लागलाय, संज्या तू फटाके खाणारच आहेस पण खास तुझ्यासाठी तुला सेनाभवनच्या आत नेहून फटके टाकणार. काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देतोय आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत,” असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
निलेश राणे यांनी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यावरही ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे. काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत असं म्हणत निलेश राणेंनी सदा सरवणकर यांना टोला लगावला आहे.
निलेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्रात या कुठल्या औलादी जन्माला आलेत ज्याना वाटतं ही अशी फडतूस नावं ठेवून आम्हाला घाबरू शकतात? मला फरक पडत नाही. पोलीस डिपार्टमेंटने हे गंभीरतेने घ्यावं कारण जो माणूस वॉन्टेड दहशतवादी आहे त्याला जर महाराष्ट्रात काही जण देव समजत असतील तर त्यांना आत्ताच ठेचून काढा, असंही राणे यांनी म्हटलं आहे.