अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील टाकरखेडा शेत शिवारातील शनि मंदिराजवळ पत्ता जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी त्यांच्याकडून 3,46,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे सदस्य, पोकों/2026 प्रशांत विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी 5 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पोलिस उपअधिक्षक श्री केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कारवाई केली. त्यांना गुप्त बातमीदारांद्वारे माहिती मिळाली होती की, टाकरखेडा ता. अमळनेर येथील समाधान धर्मा पाटील यांच्या शेतात काही इसम झन्ना मन्ना नावाच्या पत्त्याचा जुगार खेळत आहेत. माहिती मिळताच, पोलिसांनी वरील संदर्भातील कारवाई सुरू केली आणि घटनास्थळावर छापा टाकला. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून काही वेळातच पत्त्याच्या कटवरून जुगार खेळणारे इसम रंगेहाथ पकडले.
मुद्देमालासह आरोपींना अटक
पोलिसांनी अमळनेरमध्ये छापा टाकून पत्ता जुगार खेळणाऱ्या आरोपींवर कारवाई केली असता त्यांच्याकडून 3,46,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, ज्यात रोख रक्कम, हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मोटरसायकल, बजाज कंपनीची डिस्कव्हर मोटरसायकल, होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल, हिरो कंपनीची स्पेल्डर मोटरसायकल, बजाज कंपनीची प्लॉटीना मोटरसायकल, बजाज कंपनीची रिक्षा समाविष्ट आहेत. पोलिसांनी प्रकाश भगवान महाजन (वय 36 वर्षे रा. मोठा माळी वाडा, धरणगाव), भाईदास सोनु अहिरे (वय 59 वर्षे रा. लोणे ता. अमळनेर), रमेश आत्माराम महाजन (वय 50 वर्षे हनुमान नगर, धरणगाव), बापु जगन्नाथ पाटील (वय 40 रा. शिवाजी नगर, पैलाड, अमळनेर), समाधान धर्मा पाटील (वय 40 रा. टाकरखेडा ता. अमळनेर), शिवलाल धर्मा पाटील (वय 36 वर्षे रा. टाकरखेडा ता अमळनेर), विजय पंढरीनाथ सोनवणे (वय 43 वर्षे रा. निशाने ता. धरणगाव), शिवदास प्रकाश धनगर (वय 37 वर्षे रा. नेहरू नगर, धरणगाव), धनंजय श्रीराम चव्हाण (वय 33 वर्षे रा. बोरसे गल्ली अमळनेर) यांना अटक केली आहे.
यांनी केली कारवाई
पोकों/2026 प्रशांत विजय पाटील, पोउपनि / नामदेव बोरकर, सफौ/1086 राजेंद्र कोठावदे, पोहेकाँ/1998 मिलिंद सोनार, पोकाँ/2826 विनोद संदानशिव, पोकाँ/1311 निलेश मोरे, पोकाँ/1541 उज्वलकुमार म्हसके, पोकाँ/1077 गणेश पाटील, पोकॉ/537 अमोल पाटील, पोकॉ/1254 सचिन पाटील, पोकाँ/686 राहुल पाटील, पोकों/1870 उदय बोरसे यांनी कारवाई केली.