जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातील एकूण १६ उपकेंद्रावर सकाळी १० ते दुपारी १२ व दुपारी ३ ते ५ या वेळेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पुर्व परीक्षा २०२१ घेण्यात येणार आहे. परीक्षेच्यावेळी गैरप्रकार होऊ नये यासाठी शहरातील एकूण १६ परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रवेशास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेशान्वये बंदी घातली आहे. सदर आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही.
















