अहमदनगर (वृत्तसंस्था) ‘आपण सकारविरोधात उपोषण करतो म्हणून केंद्र सरकार आपल्याशी सूडबुद्धीनं वागते की काय, असा संशय निर्माण होत आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारनंही अशाच सुडाच्या भावनेनं उपोषण करून नये म्हणून आपल्याला तुरुंगात टाकलं होतं. मात्र, हे त्यांना चांगलंच महागात पडलं. जनतेनंच त्या सरकारला धडा शिकविला. त्यामुळं आपलं कोणी काही करू शकत नाही, अशा भ्रमात सध्याच्या सरकारनंही राहू नये, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे.
केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात झालेली आजची नववी बैठकही निष्फळ ठरली आहे. शेतकऱ्यांचा एकच रेटा आहे. कृषी कायदे रद्द करण्यात यावेत आणि एमएसपी कायदा लागू करावा. पुढची बैठक ही १९ जानेवारीला होणार आहे. मात्र याचदरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. ‘आपण सकारविरोधात उपोषण करतो म्हणून केंद्र सरकार आपल्याशी सूडबुद्धीनं वागते की काय, असा संशय निर्माण होत आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारनंही अशाच सुडाच्या भावनेनं उपोषण करून नये म्हणून आपल्याला तुरुंगात टाकलं होतं. मात्र, हे त्यांना चांगलंच महागात पडलं. जनतेनंच त्या सरकारला धडा शिकविला. त्यामुळं आपलं कोणी काही करू शकत नाही, अशा भ्रमात सध्याच्या सरकारनंही राहू नये,’ अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला पुन्हा एकदा सुनावलं आहे. उपोषणासाठी जागा दिली नाही, तर मागीलप्रमाणे जागा मिळेल तिथं उपोषण करीन असा इशाराही त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीत उपोषण करण्याचा इशारा हजारे यांनी दिला आहे. त्याची माहिती देण्यासाठी सरकारला आणि जागेची परवानगी मिळावी यासाठी संबंधित प्रशासनाला पत्रं पाठविली आहेत. त्यांचे उत्तर न मिळाल्यानं हजारे भडकले आहेत. काल त्यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना पत्र लिहून आपण माझ्याशी सूड बुद्धीनं वागत आहात काय, असा प्रश्न केला आहे. हाच मुद्दा घेऊन हजारे यांनी आज पुन्हा सरकारवर निशाणा साधला आहे.
हजारे यांनी म्हटलं आहे, ’हे सरकार माझ्याशी सूडबुद्धीनं वागलं तरीही मी ठरविलं आहे की, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीत उपोषण करायचंच. जिथं जागा मिळेल तिथं बसणार आहे. २०११ च्या आंदोलनाच्यावेळी तत्कालीन केंद्र सरकारनं जागा दिली नाही. म्हणून मी जेपी गार्डनमध्ये आंदोलन करायचं ठरवलं. तर सरकारनं मला सकाळी सहा वाजताच उचललं. दोनशे ते अडीचशे पोलिस पाठवून मला तिहार तुरुंगात नेऊन टाकलं. आंदोलनाला बसून दिलं नाही, सूड बुद्धीनं वागलं. मात्र, पुढं काय झाले? त्यावेळी मला तरुंगात टाकणं गरजचं होतं का? तरीही ते सूडबुद्धीनं वागले आणि शेवटी सरकार गेलं. म्हणून या सरकारनं यातून धडा घ्यावा. हे खरे आहे की या सरकारचे देशभर वर्चस्व वाढलेलं आहे. त्यावेळच्या सरकारप्रमाणे होणे थोडंसं अवघड आहे. या सरकारलाही तेच वाटत असेल की आमचं कोण काय करू शकतं. मात्र, मतदार हा राजा आहे. त्यांनी मनात आणलं तर काहीही होऊ शकतं. त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की, एका फकीर माणसाचा अंत पाहू नये. शांतता आणि असंहिसेच्या मार्गानं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळं काहीही झालं तरी या महिन्याच्या अखेरीस आपण आंदोलन करणार आहोत,’ असंही हजारे यांनी ठामपणे सांगितलं.
आंदोलन सुरू असलेल्या दिल्लीच्या सीमांवर आता मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. २६ जानेवारीचा गणतंत्र दिवसाचा सोहळा लक्षात घेत मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीकडे येत आहेत. ओडिशाहून आज निघालेली शेतकऱ्यांची यात्रा प. बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशमार्गे दिल्लीत २१ जानेवारीला पोहोचत आहे. विविध राज्यांतील शेतकरी यात सहभागी होतील. १२ जानेवारी रोजी पुण्याहून निघालेले शेतकरी २६ ला दिल्लीत पोहोचतील.