पुणे (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे प्रशासनावर टीका केली. मात्र त्यांनी केलेली टीका नेटकऱ्यांना फारशी आवडली नसल्याचे दिसत आहे. कारण त्यांनी केलेल्या टिकेवरून कोल्हे हे सध्या ट्रोल होताना दिसत आहेत. पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे विमानतळावर असलेल्या पेन्टिंग्जवरून त्यांनी ट्वीट केले आहे. ही पेन्टिंग्ज पेशवेकालीन आहेत. पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही असेही डॉ. कोल्हे यांनी म्हटले. त्यांच्या या पोस्टची चर्चा सुरू आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे विमानतळावर फोटो, सेल्फी घेतला. त्यांनी पुणे विमानतळ प्राधिकरणाला पेशवेकालीन पेन्टिंग्जवरून प्रश्न उपस्थित केले आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, सिंहगडही आहे आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी, तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे याचा पुणे एअरपोर्ट आॅथॅरिटीला विसर पडला की काय? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेकांनी हे ट्वीट योग्य असल्याचे म्हटले. तर, काही युजर्सने तुम्ही खासदार असून त्यावर कार्यवाही करा अशी मागणी केली आहे. डॉ. कोल्हे यांच्या ट्वीटला काहींनी विरोधदेखील केला आहे. एका युजरने पेशव्यांबद्दल आदर असेल तर पुणे विमानतळाचे नामकरण श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे असे करावे अशी मागणी केली आहे.