भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील अनाधिकृत बांधकाम /अतिक्रमण व बेकायदेशीर करणाऱ्या तिघांना भुसावळ नगरपरिषद भुसावळ यांनी दि. ३ मे २०२१ रोजी नोटीस बजविण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील मोहम्मदी नगर भागातील रहिवाशी अल हिरा स्कुलचे हाजी अन्सारी शेख तसेच फिरोज खान नाजीर खान रा. प्लॉट नंबर ९, खान कॉलनी मोहम्मदी नगर तसेच निसार इब्राहिम बागवान रा. प्लॉट नंबर ९ खान कॉलनी मोहम्मदी नगर मधील रहिवाशांनी प्लॉटमध्ये दक्षिणेकडील रस्त्यावर कंपाऊंड वाॅलचे अनधिकृत बांधकाम केलेले असून दि. ३ मे २०२१ रोजी सदरील अनधिकृत बांधकामाची नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता सदरचे अनधिकृत बांधकाम /अतिक्रमण व बेकायदेशीर आढळून आले आहेत. याबाबत नगरपरिषदेने तिघांना नोटीस बजाबली असून नोटीस मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत अनधिकृत बांधकाम /अतिक्रमण स्व खर्चाने पाडण्याचे नोटिसद्वारे कळविले आहे. अन्यथा महाराष्ट्र नगर परिषद व नगर पंचायत अधिनियम १९६५ (कलम १८९) व महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना १९६६ (कलम ५२,५३,५४) नुसार आपणा विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे भुसावळ नगर परिषदचे मुख्यधिकारी संदीप चिद्रवार यांनी नोटीसद्वारे कळविले. याबाबत सविस्तर माहिती हाजी शेख नईम शेख कालू यांनी दिली.