नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या नवीन पुस्तिकेननुसार ‘जुमलाजीवी’, ‘हुकुमशाह’, ‘भ्रष्ट’, ‘कोविड स्प्रेडर’, ‘शकुनी’, ‘जयचंद’, ‘बालबुद्धी’, ‘लॉलीपॉप’, ‘स्नूपगेट’ असे शब्द लोकसभा आणि राज्यसभेत असंसदीय मानले जाणार आहेत. दरम्यान, हा नविन भारताचा नवीन शब्दकोष आहे, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लगावला. ते म्हणाले की, सरकारच्या कामकाजाचे योग्य वर्णन करणाऱ्या शब्दांवर बंदी घालण्यात आली आहे.
केंद्र सरकारचं पावसाळी अधिवेशन येत्या 18 जुलैपासून सुरू होणार आहे. त्याआधी लोकसभा सचिवालयाकडून ‘असंसदीय’ शब्दांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या शब्दांचा वापर सभागृहाच्या कामकाजात आता सदस्यांना करता येणार नाही. लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या नवीन पुस्तिकेननुसार ‘जुमलाजीवी’, ‘हुकुमशाह’, ‘भ्रष्ट’, ‘कोविड स्प्रेडर’, ‘शकुनी’, ‘जयचंद’, ‘बालबुद्धी’, ‘लॉलीपॉप’, ‘स्नूपगेट’ असे शब्द लोकसभा आणि राज्यसभेत असंसदीय मानले जातील. एकमेकांवर आरोप करताना यातील बरेचसे शब्द संसदेत वापरले जातात.
18 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयाकडून असंसदीय शब्दांची यादी आली आहे. या यादीत शकुनी, हुकूमशहा, हुकूमशाही, जयचंद, विनाश पुरुष, खलिस्तानी, अराजकतावादी आणि हुकूमशाही असे अनेक इंग्रजी-हिंदी शब्द आहेत. याचा अर्थ संसदेत किंवा इतर कोणत्याही प्रसंगी हे शब्द वापरले गेले तर ते सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकले जातील. हे शब्द आणि वाक्प्रचार सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याचे अंतिम अधिकार राज्यसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेच्या सभापतींना असतील.