मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना आमचीच, आम्ही बाळासाहेबांचेच शिवसैनिक असं ठासून सांगणारे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री हे भाजपचे नेते असल्याचा असल्याचा जावईशोध गुगलने लावला आहे.
कोणतीही माहिती मिळवण्यासाठी आपण सहज गुगलचा वापर करतो. पण, ती माहिती खरी असेलच याची खात्री आता केली पाहिजे. कारण, गुगलवर गुलाबराव पाटील यांचं नाव सर्च केले असता त्यांचा राजकीय पक्ष भाजप असा उल्लेख आढळून येत आहे. राज्यात गेल्या दोन महिन्यापासून कोणता नेता कोणत्या पक्षात आहे. हे त्यांच्या कार्यकर्त्यासुद्धा माहिती नाही. राज्यात नुकतेच काल मंत्री मंडळाचा विस्तार झालेला आहे. मध्ये शिंदे सेनेतर्फे शिवसेनेची मुलुख मैदान तोफ समजले जाणारे गुलाबराव पाटील यांनाही कॅबिनेट मंत्री पदाची माळ गळ्यात पडली आहे. पण आज सकाळपासून गुलाबभाऊ यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी असा असल्याचे दाखवत आहे. गुगलवर गुलाबराव पाटील असे जर शोधले तर विकिपीडियामध्ये गुलाबराव पाटील यांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी असे दाखवत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गुलाबराव पाटील यांच्या प्रोफाईलमध्ये ते शिवसेना प्रवक्ते असल्याचे सांगतेय. खाली राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी असल्याचे सांगत आहे. त्यामुळे नेमकं गुगलला झालंय काय?असा सवाल उपस्थितीत झाला आहे.विकिपीडिया शक्यतो कुणीही अपडेट करू शकतो. पण, एवढ्या मोठ्या सर्च इंजिनवर एका मोठ्या राजकीय व्यक्तीचा पक्ष कसा चुकू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याआधीही गुगलकडून अशा बऱ्याच चुका झालेल्या आहे. कधी भारताचा मॅप चुकीचा दाखवला आहे. तरी कधी कुणाचे नाव चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. त्यामुळे गुगल सगळंच काही खरेच सांगतो, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. गुलाबराव पाटील, दादा भुसे यांच्यासह अनेक बंडखोर आमदारांचा राजकीय पक्ष देखील भारतीय जनता पक्ष असल्याचे गुगलवर दिसत आहे.
















