कासोदा ता, एरंडोल (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांना गांधी मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या सामाजिक कार्य व पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन होप फाउंडेशन अँड चारीटेबल ट्रस्ट मुंबई यांचे फाउंडेशन प्रेसिडेंट एडवोकेट डॉ, शेख अहमद यांनी हा पुरस्कार देऊन सन्मानित केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. यापूर्वीही त्यांना जिल्हास्तरीय राज्यस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. जळगाव येथील आमदार राजूमामा भोळे यांनी त्यांचे उल्लेखनीय कार्य ती दखल घेऊन त्यांना पत्र पाठवून अभिनंदन केले आहे.
एरंडोल येथील अँग्लो उर्दू हायस्कूल येथे एका कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. अंगलो उर्दू हायस्कूल चे चेअरमन जहीर शेठ अब्दुल करीम सालार, आमदार चिमणराव पाटील, एडवोकेट किशोर काळकर, एरंडोल तालुक्यातील पत्रकार बांधवांनीही त्यांचे अभिनंदन केले.