कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय उभारणी पुरस्कार प्राप्त नुरुद्दीन मुल्लाजी यांना ‘मदर डे’चे औचित्य साधून वल्लारी फाउंडेशन बेंगलोर यांच्यावतीने मदर टेरेसा नॅशनल सेवा रत्न २०२१ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यापूर्वीही त्यांना बरेचसे पुरस्कार मिळालेले आहे. त्यांच्या कार्याची दखल राज्यपातळीवर व राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.