जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील एका गावातील महिला डॉक्टरला वेगवेगळ्या नंबरवरून अश्लिल संभाषण करून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Cyber Crime Jalgaon)
या संदर्भात अधिक असे की, दि.२९ डिसेंबर २०२२ ते ४ जानेवारी २०२३ रोजीच्य दरम्यान मो.क्र.७६४६९६६७०९, ८९८७५५३७६७, ८८९५६१४९२६, ७६५६०५८५००, ९४७६३३०१८५ या मोबाईल धारकाने महिला डॉक्टरचा नंबर मिळवून अश्लील संभाषण करत मानसिक त्रास दिला. यानंतर पिडीत महिला डॉक्टरने जळगाव सायबर पोलिसात (Jalgaon Cyber Police) धाव घेत अज्ञात मोबाईल नंबर धारक व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी आयटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. रंगनाथ धारबळे हे करीत आहेत.