जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक संभोग (Unnatural Intercourse With a Minor Student) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी एका २८ वर्षीय विकृत तरूणाविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime News)
जळगाव शहरातील एका भागात तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत दि. १२ जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गुड्डू (वय साधरण २८ वर्षे) नामक तरुणाने पिडीत विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक संभोग केला. दुसऱ्या दिवशी पिडीत विद्यार्थ्याने रामानंद नगर पोलीस स्थानक गाठत तक्रार दिली. या प्रकरणी पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय गोपाल देशमुख हे करीत आहेत.