धरणगाव (प्रतिनिधी) श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात श्रमण सूर्य, जगतपूज्य, युगप्रवर्तक प.पू.संतशिरोमणी आचार्यश्री १०८ विद्यासागरजी महामुनिराजांना आज विनयांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मंगलाचरणाने तनय डहाळे व रिता डहाळे यांनी केले. त्यानंतर आचार्यश्री विद्यासागरजी महामुनिराजांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन डॉ. मिलिंद डहाळे, मनोज डहाळे, विवेक लाड, राजेश डहाळे, श्रेयान्स जैन, प्रतीक जैन व राहुल जैन यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदिराचे अध्यक्ष राहुल जैन यांनी केले. त्यामध्ये आचार्यश्रींनी केलेल्या योजनांचा उल्लेख केला.
आचार्यश्रींनी भारतात अनेक ठिकाणी गोशाळा निर्माण केल्या. तसेच मुलींच्या शिक्षणासाठी अनेक ठिकाणी प्रतिभास्थळी निर्माण केल्या. बेरोजगार युवकांसाठी अनेक ठिकाणी हतकरघा निर्माण केले.तसेच आचार्यश्रींनी मुकमाटी महाकाव्य रचले आहे. आचार्यश्रींनी अनेक ठिकाणी सुंदर अश्या मंदिरांची निर्मिती केली असून सर्वात जास्त पंचकल्याणक महामहोत्सव केलेले आहेत. आचार्यश्री विद्यासागरजी यांना संस्कृत,प्राकृत,हिंदी,मराठी व कन्नड यासह विवीध भाषांचे ज्ञान होते. त्यांनी हिंदी व संस्कृतमध्ये अनेक रचना केल्या व ७०० हायकू कविता पण रचल्या. विविध संशोधकांनी त्याच्यावर डॉक्टरेटसाठी अभ्यास केला. व जवळपास ५४ लोकांनां डॉक्टरेट मिळाली.
दिगंबर मुनी परंपरेचे आचार्यश्री महाराज एकमेव देशातील आचार्य आहेत की ज्यांनी ५०५ मुनी,आर्यिका,ऐलक व क्षुल्लक दीक्षा दिल्या आहेत. आचार्यश्रींना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी वर्षातून 1/2 वेळा अवश्य यायचे व मार्गदर्शन/प्रेरणा घ्यायचे. त्यावेळी आचार्यश्री विद्यासागर महामुनिराज त्यांना सांगायचे की इंडिया नहीं भारत बोलना चाहीये। मातृभाषेवर प्रेम करा व प्रसार करा.
धरणगाव भाविकांचे पुण्य एवढे होते की आचार्यश्री १९९७ मध्ये जळगाव जिल्ह्यात आले असता त्यांच्या पदस्पर्शाने धरणगाव नगरी पावन झाली. श्री. मोहन काका जैन ह्यांनी धरणगावी येण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, व आचार्यश्रींचा आहार सुद्धा मोहन काका यांच्याकडे झाला होता. त्यानंतर आचार्यश्रींचे पूजन राजुलमती महिला मंडळद्वारा करण्यात आले. तसेच अनेक मान्यवरांनी आपले मनोगत विनयांजली रुपात भाव प्रकट केले. त्यामध्ये डॉ.मिलिंद डहाळे, कनकलता जैन, ध.अर्चना बन्नोरे, प्रतीक जैन व ध.पुनीत लाड होते.
कार्यक्रमाच्या शेवटी संतशिरोमणी आचार्यश्री विद्यासागरजी महामुनीराजांची आरती मोठ्या भक्ती भावाने करण्यात आली. तसेच जिनवाणी मातेच्या स्तुतीने सांगता करण्यात आली. आभार प्रदर्शन प्रतीक जैन यांनी केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला,पुरुष मंडळी उपस्थिती होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष राहुल जैन, उपाध्यक्ष प्रतीक जैन व सेक्रेटरी श्रेयान्स जैन, सावन जैन, उदय डहाळे यांचे अनमोल सहकार्य लाभले.