TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने मुक्ताईनगर मतदारसंघात संवाद दौऱ्याचे आयोजन !

सत्ताधाऱ्यांनी शेतकरी, कष्टकरी, महिला युवकांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष केले : रोहिणीताई खडसे !

vijay waghmare by vijay waghmare
October 17, 2024
in बोदवड, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 च्या पाश्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे ध्येय धोरणे, विकास कामे मतदारांपर्यंत पोहचवून मतदारांसोबत संवाद साधण्यासाठी गाव भेट संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

बोदवड तालुक्यातील गाव भेट संवाद दौऱ्याचा शुभारंभ शिरसाळा येथे श्री सिद्धेश्वर हनुमानजींचे दर्शन घेऊन पक्षाचे जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. यानंतर रविंद्र भैय्या पाटील, रोहिणी खडसे आणि पदाधिकाऱ्यांनी शिरसाळा, चिंचखेडा सिम, कोल्हाडी, हिंगणे, आमदगाव आणि बोदवड शहरातील विविध प्रभागात भेटी देऊन ग्रामस्थ नागरिकांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

सत्ताधाऱ्यांचे सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष – रविंद्र पाटील !

याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील म्हणाले की, हा मतदारसंघ कायम शरद पवार यांच्या धर्मनिरपेक्ष व विकासाभिमुख विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहिला आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले असून ते आता विविध योजनांच्या माध्यमातून प्रलोभने दाखवून आपल्या वरील गद्दारीचा शिक्का पुसू पाहत आहेत आणि मतदारांना विकत घेऊ पाहत आहेत. परंतु, या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळणाऱ्या गद्दारांना मातीत गाडून महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठिशी उभे राहण्याचे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.

सत्ताधाऱ्यांनी शेतकरी, कष्टकरी, महिला युवकांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष केले : रोहिणीताई खडसे !

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, सत्ताधाऱ्यांनी महागाई कमी करण्याचे, शेतमालाला हमीभाव देण्याचे युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, सत्ताधाऱ्यांनी शेतकरी, कष्टकरी, महिला युवकांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष केले आणि आता निवडणुकीच्या तोंडावर विविध योजना जाहीर केल्या. परंतु, एका हाताने मदत देत असताना दुसरीकडे प्रचंड महागाई करून दिलेली मदत काढून घेण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. आपल्या मतदारसंघात आ. एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली. परंतु, गेल्या पाच वर्षात या मतदारसंघाचा विकास रखडला आहे. रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी आ. एकनाथराव खडसे यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या बोदवड उपसा सिंचन योजना आणि इतर योजना राजकीय द्वेषभावनेतून निधी अभावी रखडलेल्या आहेत. या योजनांना निधी उपलब्ध करून देऊन त्या पुर्णत्वास नेऊन शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून विधानसभा निवडणुकीत साथ व आशीर्वाद देण्याचे रोहिणी खडसे यांनी उपस्थितांना आवाहन केले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुका अध्यक्ष प्रशांत (आबा) पाटील, बाजार समिती उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, कैलास चौधरी, रामदास पाटिल, अनिल पाटील, अनिल वराडे, विलास देवकर, सतिष पाटिल, निलेश पाटिल, किशोर गायकवाड, गणेश पाटिल, मधुकर पाटिल, रामभाऊ पाटिल, डॉ ए एन काजळे, भरत अप्पा पाटिल, वामन ताठे, सुभाष पाटिल, विनोद कोळी, शाम सोनवणे, विश्वनाथ पाटिल, गोपाळ गंगतिरे, के एस इंगळे, प्रमोद शेळके, रामराव पाटिल, शांताराम पाटिल, हकीम बागवान, प्रविण पाटिल, प्रमोद फरफट, निलेश पाटिल , सचिन राजपुत, आनंदा पाटिल, प्रफुल लढे, चंद्रकांत देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
Next Post

धरणगाव श्री.बालाजी वहनोत्सव : पोलिस कर्मचाऱ्यांचा हस्ते सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अखेर जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचा बिगूल वाजला, २१ नोव्हेंबर रोजी मतदान

October 9, 2021

शर्यत जिवावर बेतली: डंपरच्या धडकेत २ मित्र जागीच ठार

October 27, 2022

प्रेमाचं नाटक अन् एका निराधार महिलेला FBवरील मित्रानं घातला ८ लाखांचा गंडा

January 1, 2022

पाणी चळवळीचे प्रणेते उज्वलकुमार चव्हाण यांची वर्धमान भाऊ धाडीवाल यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट !

June 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group